
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे हाती घेण्यात आलेल्या विश्वकोशमधील संगीत म्हणजेच गायन,वादन,नृत्य या विषयासाठी नोंदीच्या अद्यावतीकरणाचे पालकत्व कोल्हापुरातील १३२ वर्षाची सांगीतिक परंपरा असलेल्या गायन समाज देवल क्लब सोपविण्यात आली आहे.या संधर्भात विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई,आणि देवल क्लब यांच्यामध्ये ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी नुकताच करार करण्यात आला.देवल क्लबची निवड महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आली आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.संगीत यात हिंदुस्थानी,कर्नाटकी,पाश्चिमात्य तसेच गायन,वादन आणि नृत्य या संपूर्ण विभागासाठी देवल क्लब काम पहाणार आहे.विश्वकोशाच्या निर्मितीसाठी ,पुनर्लेखन,अद्यावतीकरण आणि नोंदी लिहण्यासाठी तसेच संकेतस्थळावर या नोंदी ठेवण्यासाठी आणि यांची पूर्तता जलद गतीने पूर्ण करण्यासाठी या विषयातील तज्ञांचे अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आले आहे.यात कोल्हापुरातील ज्येष्ठ गायक अभ्यासक आणि गांधर्व महाविद्यालयाचे भूतपूर्व सचिव पंडित सुधीर पोटे यांची समन्वयकपदी निवड झाली आहे.तसेच हार्मोनियम वादक चैतन्य कुंटे,प्रसिद्ध कथक कलाकार रोषण दाते,पखावज वादक आणि कर्नाटकी संगीत अभ्यासक पंडित.ए.अनंतशास्त्री शर्मा,गिटारवादक आणि पाश्चिमात्य संगीत अभ्यासक रॉक लाझारस गायक आणि नाट्य अभ्यासक डॉ.विनोद ठाकूर देसाई आणि ज्येष्ठ चित्रकार व समीक्षक माधव इमारते यांची या ज्ञान मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या शतकाहून अधिक संगीत परंपरा असलेल्या देवल क्लबसारख्या संस्थेला हा मान मिळाल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला असे मत कार्यवाह श्रीकांत डिग्रजकर यांनी व्यक्त केले.पत्रकार परिषदेला व्ही.बी.पाटील,मंडळाचे सदस्य दीपक जेवणे यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर,देवल क्लब सभासद आणि संगीत प्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply