
कोल्हापूर:राज्य शासन सांस्कृतिक कार्य मंत्रालय आयोजित 56 व्या हौशी नाट्य स्पर्धेत ह्रदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठ संस्थेचे ‘अग्निदिव्य’या नाटकास दिग्दर्शन,नेपथ्य,अभिनय व रंगभूषा या चार विभागात प्रथम क्रमांक मिळाला.
गतवर्षी काळम्मावाडी येथील हनुमान तरुण मंडळ यांच्या सहयोगाने पुन्हा सादर केले.याच नाटकाचा प्रयोग पुन्हा उद्या बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे होत आहे.तसेच 22 फेब्रुवारी पासून हौशी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात होत आहे.शुक्रवारी 3 मार्च रोजी रात्री 8 वाजता टिळक स्मारक मंदीर, सदाशिव पेठ पुणे येथे अग्निदिव्य सादर होत आहे यामुळे छत्रपती शाहु महाराज यांच्या तेजस्वी विचारांचा आणि ओजस्वी व्यक्तीमत्वाचा विजय आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पद्माकर कापसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाटकाचे दिग्दर्शन सुनील माने व प्रकाश पाटील यांनी केले असून अशोक पाटोले यांनी लेखन केले आहे.सौ.पद्मिनी पद्माकर कापसे यांनी याची निर्मिती केली आहे.सागर चौगुले,नागेश पाटील, स्नेहा बिरंजे,युवराज ओतारी यांनी भूमिका उत्तम वठविल्या आहेत.या नाटकाचा प्रयोग अंतिम फेरिसाठी पुण्यात होत आहे यासाठी प्रचंड निधीची गरज आहे,म्हणूनच शाहुंच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या करवीरवासियांनी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी कोल्हापुरात होणाऱ्या प्रयोगाच्या देणगी प्रवेशिका घेऊन याला उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply