
कोल्हापूर: आजच्या काळात पत्रकार म्हणून काम करायची लाज वाटते,प्रसारमाध्यम सुद्धा सत्तांध होतात आज तर अर्थांधही झाली आहेत.महाराष्ट्राच्या अधोगतीला सर्व माध्यमेही राजकारण्यांइतकीच जबाबदार आहेत.बुदधीवंतांचा महाराष्ट्र हा बदमाशांचा महाराष्ट्र बनला.भारतीय माध्यमांचे बाजारीकरण झाले आहे.माध्यमे अंकुश ठेवण्यात कमी पडत आहेत.राजकारण्यांइतकेच ही माध्यमे भ्रष्ट आहेत.पेड न्यूज घेणाऱ्यांना तर कायद्यानुसार तुरुंगात टाकले पाहिजे.अशी कडाडून टिका करत ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी प्रसारमाध्यमाची ताकद आहे.पण आज त्यांची परिस्थिती काय आहे याचे विश्लेषण केले.शिवाजी विद्यापीठ आयोजित आजचे वर्तमान आणि प्रसारमाध्यमे या विषयावर आज वागळे यांनी मार्गदर्शन केले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी प्रसारमाध्यम हा वन वे ट्राफिक असू शकत नाही.एका बाजूला पत्रकार,संपादक तर दुसऱ्या बाजूला वाचक,प्रेक्षक महत्वाचे आहेत.त्यामुळे नागरिकही यावर अंकुश ठेऊ शकतात.प्रसारमाध्यमाचा ढाचा बदलला तरी मूळ पत्रकारितेचा आत्मा कायम असतो.पत्रकाराची दोन अस्त्रे असतात.लेखणी आणि वाणी.त्याचबरोबर त्याची भारतीय संविधानाशी बांधिलकी असणे गरजेचे आहे.माध्यमात काम करायचे असेल तर पत्रकारिता ही शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्यासाठी पूल आहे.कुठल्याही माध्यमात ती केली तरी सामान्यांपर्यंत ती जोडली गेली पाहिजडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले पण त्यांचे यात योगदान महत्वाचे आहे.महाराष्ट्राच्या मातीत लढण्याची परंपरा आहे.त्यामुळे शेवटपर्यंत संघर्ष करत रहाणार.असेही ते म्हणाले.
चीन आणि भारत याठिकाणी जास्त लोकसंख्या असल्याने वाचक आणिप्रेक्षक वर्ग जास्त आहे.चीनमध्ये लोकशाही नाही.पण भारतात आहे.म्हणूनच परदेशी गुंतवणूक भारतात जास्त झाली आणि तीही प्रसारमाध्यमात म्हणजे चॅनेलमध्ये गेल्या १० वर्षात १५ न्यूज चॅनेल आली.इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा पसारा वाढला.यामुळे जगभरातील भांडवलदार विरुद्ध भारतीय भांडवलदार अशी परिस्थिती निर्माण झाली.पण यामुळे रोजगार वाढला.अनेक तरुण मुलांना काम मिळाले. टाईम्स सारख्या ग्रुपला तळागाळात जाऊन आपले वृत्तपत्र न्यावे ही बुद्धी तेंव्हा सुचली.संपादक स्वतःच्या हस्ती दंती मनोऱ्यात बसत असेल आणि जनतेच्या घामाचा वास त्याला अक्षेपार्ह वाटत असेल तर तो कसला संपादक?असा सवालही वागळे यांनी केला.
पत्रकाराची तीन कर्तव्य असतात.माहिती शिक्षण आणि मनोरंजन.पण आज हे चित्र उलटे दिसत आहे.१९९० साली बलाढ्य माध्यमांच्या मध्ये महानगर वृत्तपत्र सुरु केले.मराठीच्या डबक्यात एक दगड मारला.आपण सत्य बोलले पाहिजे.हीच वृत्ती ठेवल्याने माझ्यावर हल्ले झाले.आमच्याबरोबर शिवसेना लहानाची मोठी झाली.१९६६-६७ साली दोन महाराष्ट्राचे नेते शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे प्रस्थापित झाले.मुंबईच्या शिवसेनेचा राडा आणि इतर शहरातील शिवसेना वेगळी आहे.बाळासाहेब ठाकरे तुरुंगात त्यांना बियर मिळाली नाही म्हणून रडले या विरोधात मराठी माध्यम गप्प बसली कुणी आवाज नाही उठवला .आता तर अतिशय हुशार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वल्लभभाई पटेल पुतळा स्थानिकांचा विरोध असतानाही बसविला तरी माध्यमे गप्पच.२०१३ साली आयबीएन लोकमत मुकेश अंबानी यांनी विकत घेतले.मोदींनी मालकाशी संगनमत करून माध्यमे स्वतःकडे फिरवून घेतली.मोदींविरुद्ध टिका करू नये असे मेल यायचे.पण अंबानीसारख्या उद्योजकाकडे काम करण्याचे माझ्या नशिबात नाही.मी राजीनामा दिला.ह्याच गोष्टी इतर माध्यमांच्या बाबतीत घडल्या.३० हजार कोटीचा उद्योजक अंबानी अशी किती माध्यमे घशात घालेल,उद्या भारत देशाचे नाव रिलायंस इंडिया होईल.आधी फुकट आणि मग लुट असा गुपचूप वार हुशार मोदी करतात.मोदी खोट बोलतात.किती काळा पैसा बाहेर आला,नोटा रद्द करून सामान्यांना का त्रास दिला.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी एवढा पैसा कुठून आला हे माध्यमे का नाही त्यांना विचारत?असा सवाल त्यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर होता पण आता ते फक्त बोलक ढलप झाले आहेत.असेच चालू राहिले तर देश धोक्यात आल्याशिवाय रहाणार नाही.
४० वर्षाच्या पत्रकारितेने मला समाधान दिले पण आजच्या काळात पत्रकारिता सोडून सगळ्या गोष्टी केल्या जातात म्हणूनच पत्रकार म्हणून काम करण्याची लाज वाटत आहे असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी काढले.यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ.राजन गवस,विदेशी भाषा प्रमुख डॉ.मेधा पानसरे,विद्यार्थी, श्रोते,मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply