
मुंबई:गेल्या काही काळात मराठी चित्रपटसृष्टीत रोमँटिक चित्रपटांनी लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेमकथा असूनही वेगळा आशय मांडणारा ‘इश्कवाला लव्ह’ हा चित्रपट स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 आणि रात्री 7 वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. उत्तम कथानकासह आदित्य कोठारे आणि सुलग्ना पाणीग्रही ही नवी जोडी या चित्रपटाची खासियत आहे.
रेणू देसाई यांनी ‘इश्कवाला लव्ह’चं दिग्दर्शन केलं आहे. हळव्या स्वभावाचा कार्पोरेट लॉयर अजिंक्य आणि वास्तववादी, चंचल ओवी यांच्या प्रेमाची ही कथा आहे. दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांच्या प्रेमपाशात कशा गुंततात हे या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आले आहे. चॉकलेट बॉय आदिनाथ कोठारे आणि सुलग्ना पाणीग्रही ही फ्रेश जोडी या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. त्यांच्यासह भार्गवी चिरमुले, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, अपूर्वा नेमळेकर आदी प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटातील हॅलो कशी आहेस तू, बिटिंग बिंटिंग, जीव गुंतला अशी गाणी गाजली आहेत. नव्या काळातली नवी प्रेमकथा असलेला इश्कवाला लव्ह कुटुंबासह आवर्जून पहायलाच हवा.
Leave a Reply