
कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठाचा ५३वा दीक्षान्त समारंभ येत्या २४ फेब्रुवारी
रोजी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला आहे. याची माहिती देण्यासाठी आज सायंकाळी विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद झाली. यावेळी कुलपती मेडल साताऱ्याच्या स्नेहल शिवाजी चव्हाण यांना जाहीर झाले. तर राष्ट्रपती सुवर्णपदक सोनाली अजय बेकनाळकर यांना जाहीर झाले.एकूण 49 हजार स्नातकां ना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार उपस्थित होते.
Leave a Reply