
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुक नुकतीच पार पडली.पण निवडणुकीच्या काळात मागील महिन्यात होणारी सभा पुरेशी गणसंख्या नसल्याने तहकूब करण्यात आली होती.पण काही प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने तसेच नवीन सभागृह अजून स्थापन न झाल्याने जुन्या सभागृहाची तहकूब झालेली सभा नियमाप्रमाणे घ्यावी लागणार यासाठी उद्या ही सभा महापालिकेच्या सभागृहात होत आहे.आरक्षित भूमी संपादन, जुन्या वाहनांचा लिलाव आदि प्रस्ताव प्रलंबित आहेत.याला या सभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.जे नगरसेवकांना यानिवडणुकीत लोकांनी घराचा रस्ता दाखविला असे नगरसेवक उद्याच्या सभेत शेवटी जाता जाता तरी काही हाताला लागते का यासाठी नक्कीच प्रयत्न करणार अशी चर्चा लोकांमधून होत आहे.
Leave a Reply