
कोल्हापूर: जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या झाली आहे. कोल्हापुरातील म्हाडा कॉलनी परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली
डॉ. किरवले एसएससी बोर्डाजवळील अरिहंत कॉलनीत राहत होते. त्यांच्या बेडरूममध्येच ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हा घातपात की आणखी काय, याबाबतची माहिती पोलिस घेत आहेत. दरम्यान, हे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर विद्यापीठातील प्राध्यापक, आंबेडकरी चळवळीतील कायकर्ते आणि विद्यार्थ्यांनी डॉ. किरवले यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. या घटनेने चळवळीतील कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला आहे.
Leave a Reply