पाणीपट्टी थकबाकीदारांवर महानगरपालिकेची धडक मोहिम

 

कोल्हापूर  : कोल्हापूर शहर पाणी पुरवठा विभागकडील थकीत पाणीपट्टी वसुल करणेची मोहिमेअंतर्गत 9 फेब्रुवारी  ते 3 मार्च 2017 या कालावधीत सुमारे 127 थकबाकीदारांवर कारवाई करुन रक्कम रु.23,45,442/- इतकी थकबाकी वसुली करण्यात आली.  याकामी सी, डी, ई वॉर्ड भागातील रामू नाना शिंदे, आनंदराव उलपे, शेवंता कदम, रामू ज्ञानू पाटील, इमामुद्दीन मुल्ला, प्रमोद पोळ, सुशिला चव्हाण, बाबालाल मोमीन, वाडकर, कवठेकर, विष्णू सावंत, कल्पना भोरे, उज्ज्वला खोडवे, दिनकर बिडकर, शामराव मोळे, अजीत निळकंठ, ताराबाई गायकवाड, गंगाधर वडेर, धोंडीराम पाडळकर, तसेच शासकिय कार्यालयाकडील थकबाकीदारांवर कनेक्शन खंडीत करणेची  कारवाई करणेत आली.
सदरची कारवाई उपायुक्त विजय खोराटे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी व उपजल अभियंता बी.जी.कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख मोहन जाधव, पंडीत भादूलकर, उदय भोसले, सुनिल पाटील, प्रथमेश माजगांवकर, ताजुद्दीन सिदनाळे यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!