
कोल्हापूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे कैलास-मानस यात्रेबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतूहल असते.सर्वसामन्यांना आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करावी असे वाटते.तिबेटवर कब्जा केल्यानंतर बरीच वर्षे ही यात्रा बंद होती पण १५ हजार फुट उंचावर असणारे हे मानस सरोवर निसर्गाने निर्माण केलेले अद्भुत स्वप्न,ब्रह्माने जिथे विश्वनिर्मिती केली तेच हेच ठिकाण भाविकांसाठी पुन्हा खुले केले गेले.अतिशय खडतर प्रवास असणारी ही यात्रा आहे.पण आता हेलिकॉप्टर आणि विमान यामुळे ही यात्रा सुलभ झाली आहे.नेपाळ,चायना मार्गे इथे जाता येते.प्रचंड थंडी,हवानामातील बदल,ऑक्सिजनची कमी यामुळे यात्रेपूर्वी निघताना निवड चाचणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.यात्रेस 2 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.सहज सेवा ट्रस्ट च्या वतीने या यात्रेचे यशस्वी आयोजन केले गेले.याचाच अनुभव ७० फोटो,आणि व्हिडीओ यांच्या माध्यमातून एक अनोखे प्रदर्शन उद्या शाहू स्मारक कलादालन येथे भरविले जाणार आहे.५ मार्च ते ८ मार्च पर्यंत हे प्रदर्शन लोकांसाठी दिवसभर खुले रहाणार आहे अशी माहिती कैलास मानस यात्री संघाचे सुर्यकांत गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.सलग १० वेळा कैलास यात्रा पूर्ण करणारे २३ वर्षाचा अनुभव असणारे आयोजक व ABC अॅड्व्हेंचर नेपाळचे संचालक ईश्वर छत्रीय यांनीही याबद्दल आवश्यक माहिती दिली.यावेळी समिट अॅड्व्हेंचरचे विनोद कांबोज,शिवाजी अडूरकर उपस्थित होते.
Leave a Reply