
कोल्हापूर:अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाला प्राधान्य द्यावे तसेच संशोधनाकडे वळावे असा मौलीक सल्ला भाभा अणु संशोधन केंद्राच्या रियाक्टर अभियांत्रिकी विभागाचे संचालक व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. पी. के. विजयन यांनी दिला. शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील इंडस्ट्री इंस्टीयूट इंटरक्शन सेल तर्फे आयोजित भेटी मध्ये ते बोलत होते. देशाच्या प्रगतीकरिता विद्यार्थ्यांचे योगदान अतिशय महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी समाजातील प्रश्नांची माहिती करून घ्यावी तसेच अभ्यासपूर्ण प्रकल्पांवर काम करावे. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजाला उपयोगी अश्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी करून घ्यावा असे प्रतिपादन डॉ. पी. के. विजयन यांनी केले. इंडस्ट्री इंस्टीयूट इंटरक्शन सेल समन्वयक प्रा. हर्षवर्धन पंडित यांनी प्रास्ताविक केले.
तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी स्वागत केले. तंत्रज्ञान अधिविभागातील बी टेक च्या विद्यार्थ्यांना टेक्निकल व्हिजीट साठी तर एम टेक च्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट साठी भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे जाण्याची संधी मिळणार आहे असे कार्यकारी संचालक डॉ. अक्षयकुमार साहू यांनी सांगितले. अधिविभागातील विविध संशोधनाचीही माहिती प्रा. डॉ. साहू यांनी दिली. या प्रसंगी मेकेनिकल इंजिनीरिंग चे समन्वयक प्रा. अजित कोळेकर, प्रा. अनिरुद्ध जोशी, प्रा. सतीश काळे, प्रा. प्रवीण प्रभू, प्रा. दौलत नांगरे आदि उपस्थित होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी शास्त्रज्ञ डॉ. पी. के. विजयन यांच्याशी संशोधन केंद्राच्या संकल्पनेवर चर्चा केली.
Leave a Reply