
बारामती: तूरडाळीच्या वाढत्या दरांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही मोलाचे सल्ले दिले. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला डाळीच्या उत्पादनासाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं. शेतकऱ्यांना योग्य मदत दिली तर डाळीचे दर सर्व सामन्यांच्या आवक्यात येऊ शकतात असा सल्ला पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला.फक्त सणासुदीला घरा-घरामधे डाळीचीच चर्चा होते. त्याचबरोबर औरगांबादमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याचं मी टीव्हीवर पाहीलं. ते चित्रही बदलायला हवं”.
मुख्यमंत्र्यांनी हा सल्ला ऐकला. मुख्यमंत्री म्हणाले, “पवार साहेबांनी जी सूचना केलेली आहे ती अतिशय महत्वाची आणि मोलाची आहे. आम्ही नक्कीच डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याबाबत प्रयत्न करु”याशिवाय महाराष्ट्रात विकासाची बोटं तयार झाली आहेत. आपल्याकडे आधुनिक पद्धतीनेही शेती होते आणि आपल्याकडे शेतीची दुर्दशाही आहे. बारामतीसारखी कृषी प्रदर्शनं ही दरी कमी करु शकतात, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कृषीमंत्री एकनाथ खडसेंनी बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रासारख्या १० संस्था जरी उभारल्या, तरी महाराष्ट्राची शेती भरभराटीला येईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं
बारामतीत कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. याआधी कृषीप्रदर्शनात पोहोचण्यासाठी खास सवारी तयार करण्यात आली होती. माजी उपमुख्य्मंत्री अजित पवार यांनी सवारी चालवत कार्यक्रमाकडे कूच केली.
Leave a Reply