
कोल्हापूर : १ डिसेंबर पासून संपूर्ण टोलमुक्त कोल्हापूर होणार असल्याचे संकेत आज सर्किट हाउस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. १६ नोव्हेंबर पासून पुन्हा टोल आंदोलन तीव्र होणार असल्याचे टोलविरोधी कृती समितीने सांगितले होते ततपूर्वी या समिती सोबत चर्चा करून बैठक होणार आहे. त्यामुळे टोल आंदोलन पुन्हा पेटणार कि कायमचे संपणार हे या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर सांगली चौपदरीकरण सुरु आहे. त्याठिकाणी टोल नाके बसवणे सुरु आहे मात्र महाराष्ट्रात लहान वाहनांना कोठेही टोल लागणार नाही असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply