
कोल्हापूर:हिंदु नववर्ष आरंभानिमित्त गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच भव्य वाजवेल तो गाजवेल या ढोल आणि ताशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या २८ तारखेला दुपारी ४ वाजता शाहू खासबाग मैदान येथे या स्पर्धांना प्रारंभ होणार असून विजेत्या एका संघास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.त्याचबरोबर ध्वज संचलनास १० हजार रुपये यासह आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हिंदू नववर्षाचा प्रारंभ आपल्या भारतीय संस्कृतीनुसार पारंपारिक वाद्यांच्या गजरात झाला पाहिजे यामुळे भावी पिढीसमोर आपली संस्कृती जतन करण्याचा आदर्श ठेवला जाईल हाच यामागचा मूळ उद्देश आहे असेही आमदार क्षीरसागर म्हणाले.मुख्य कार्यक्रमासाठी खास सेलेब्रिटीना बोलविण्यात येणार आहे.१७ तारखेपर्यंत नोंदणीसाठी अंतिम मुदत रहाणार आहे.ही स्पर्धा जिल्हास्तरीय असून प्रत्येक पथकासाठी २० मिनिटे सादरीकरणासाठी असणार आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील अशी भव्य स्पर्धा ही पहिल्यांदाच भरविली आहे.तरी ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी शिवालय,शिवसेना शहर कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन युवा सेना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला किशोर घाटगे,पद्माकर कापसे यांच्यासह युवा सेना पदाधिकारी,सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply