
कोल्हापूर : पन्हाळा येथील मसाई पठारावर संजय लिला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. चित्रपटाचा सेट पेट्रोल बॉम्ब टाकून पेटवून दिला असल्याचे माहिती पुढे येत आहे. कोल्हापुरचे नाव मोठे व्हावे, संजय लिला भन्साळी सारख्या अनेक मोठ्या व्यक्तींनी कोल्हापुरात येवून शुटींग करून कोल्हापूरचे नाव उंचवावे अशी भावना प्रत्येक कोल्हापूर वासीयांच्या मनात असताना काही लोक येवून सेट पेटवून देतात हि गोष्ट मनाला न पटण्यासारखी असून हा एक कोल्हापुरात पब्लिसिटी स्टंट केला असल्याची चर्चा आता प्रत्येक कोल्हापूर रहिवाशांमध्ये सुरु आहे.
चार मार्च पासून शुटींग सुरु असून आज बुधवार पहाटे सेट पेटवून दिल्याचे बोले जात आहे. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तीस ते चाळीस जणांचा जमाव पेट्रोल बॉम्ब घेऊन पठारावर येवून सेट पेटवला आणि हे लोक मराठी मध्ये बोलत होते असे शुटींग कर्मचारी यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून पठाराचा विकास केला जात आहे. तसेच प्राचीन बौद्ध लेणी देखील येथे आहेत असे असताना जर कोल्हापुरात शुटींग होत आहे ही बाब कोल्हापूर रहिवासीयांची अभिमानाची गोष असे असताना असा उद्योग स्थानिक लोक का करतील असा प्रश्न सर्व लोकांना पडला आहे.
मसाई पठाराकडे जाणारे रस्ते प्रशस्त आणि सुव्यवस्थित आहेत. चार चाकी वाहने घेऊन पठारावर जाता येते. येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून पठाराचा विकास केला जात आहे. त्याला स्थानिक नागरिकांचेही पाठबळ आहे. या पार्श्वभूमीवर भन्साळी यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचा सेट पेटविण्याचा उद्योग कसा केला जाऊ शकतो, याबद्दल स्थानिक रहिवाशांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. जे शुटींग कोल्हापुरात होणार होते ते काम या काही दिवसात पूर्ण करून घेतले गेले आहे त्यानंतर अचानक ही गोष्ट घडली. जे साहित्य आगीत जळाले त्यामध्ये मुख्य: कोणतेच साहित्य दिसत नाही. यामुळे कोल्हापुरात अद्यात लोकांनी सेट जाळले असे चुकीचे पसरवले जात आहे. चित्रपट प्रदर्शनाआधीच पब्लिसिटी मिळवण्यासाठी केलेली ही एक स्टंट बाजी असल्याची चर्चा आता रंगत आहे.
Leave a Reply