जिल्ह्यातील दळणवळण सेवेच्या विकासासाठी सुमारे 800 कोटी रुपयांची तरतूद : पालकमंत्री

 
कोल्हापूर:जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद पाण्याच्या योजना मार्गी लागणार विमानतळ विकासाठीचे राज्य शासनाची 30 टक्के रकमेच्या हमीचे पत्र सुपूर्द राज्याचा समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प सर्वच घटकांना स्थान देणारा राज्याचा अर्थंसंकल्प आज सादर झाला. या अर्थंसंकल्पात जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोणत्याही जिल्ह्यातील दळणवळण सेवेचे विकास हा त्या जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. रस्ते विकास झाल्यास दळणवळण वाढून शहरे, राज्य जवळ येतात आणि त्यामाध्यमातून उद्योग, पर्यटन, कृषीमाल अशा अनेकांना त्याचा फायदा होतो. उद्योगधंद्यांच्या अनुषंगाने तसेच शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या रिंगरोडसाठी 450 कोटी रुपयांचा निधीची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. राधानगरी तालुक्यातील सोनवडे-शिवडावसाठी हा गोवा राज्याला जोडणाऱा रस्ता महत्त्वाच असून त्यासाठी 129 कोटी तसेच अन्य रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. दळणवळण सेवेचा विस्तार करताना रस्त्यांचा दर्जा हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने दहा- दहा किलोमीटरचे रस्ते केले जाणार असून या रस्त्यांच्या दोन वर्षाच्या देखभाल दुरुस्तीची गॅरंटी दिली जाणार आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी 300 कोटी खर्च येणार आहे. विमानतळाचा विकास झाल्यास आपल्याला उद्योगधंद्याच्या वाढ झपाट्याने होईल. त्यासाठी राज्य शासन यातील 30 टक्के रक्कम देईल, असे पत्र देण्यात आले आहे. त्यामूऴे विकासाची नवी सुरवात झाली आहे. पर्यटन विकासासाठी प्रयत्न सुरूच असून नृसिंहवाडी, महालक्ष्मी, बाहुबली पाठोपाठ आता जोतिबा विकासासाठी 25 कोटी दिले अर्थंसंकल्पात जाहिर करण्यात आले आहे. जोतिबा विकास हा राज्यबरोबर उत्तर कर्नाटकातील भक्तांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी विकास हा केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर झाला आहे. शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्त करून चालणार नाही. तो स्वयंपुर्ण व्हावा यासाठी दिर्घकालीन उपाय योजना केल्या जाणार आहे. पुढील काही वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठीचे नियोजन आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ या योजनांचा होणार आहे. पाण्याच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात आली आहे. त्यामूळे जिल्ह्यातील वाड्या आणि वस्त्यांवरती पाण्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आपले अधिक प्रयत्न असणार आहे. पाण्याच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!