
कोल्हापूर : कोल्हापूरकडे पर्यटकांचा ओढा वाढावा तसेच त्यांना कोल्हापुरात पर्यटनाला येण्याची सवय लागावी यासाठी कोल्हापूरचे पर्यटन हब म्हणजेच केंद्र करणार तसेच महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास व जोतीबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करणार असून येत्या डिसेंबरमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पर्यटकांच्या माहितीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळही सुरु करणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी नमूद केले. उस खरेदीकर माफ करणार, एकरक्कमी एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा बाजूचे आहे सहकारातील गोंधळाची चौकशी तसेच जिल्हा बँक कारवाई, ३४१०० कोटी रुपयांचे शेतकऱ्याना कर्जवाटप याचसोबत विविध उद्योगांना ७५ कोटींचे सहाय्य हे सरकार करणार आहे. दुष्काळ निवारण यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याचसोबत भाजप सरकार आल्यापासून १ वर्षात झालेल्या कामांचा लेखाजोगा पालकमंत्री यांनी सादर केला.
Leave a Reply