निर्मुलनासाठी सर्वानी लढा द्यावा -डॉ. कुणाल खेमणार

 

कोल्हापूर : क्षयरुग्णांच्या संख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून एकूण क्षयरुग्णांपैकी 23 टक्के रुग्ण भारतात आढळतात. क्षयरोगाचे लवकर अचूक निदान आणि नियमित औषधोपचार याद्वारे क्षयरोग संपूर्ण बरा होवू शकतो या विषयी समाजात जागृतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. अनिल मडके यांनी केले.
24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सीपीआर आवारातील ऑडोटोरियम हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात क्षयरोग व उरो तज्ञ डॉ. अनिल मडके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.आर.पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु.जी.कुंभार, डॉ. हर्षदा वेदक, क्षयरोग व उरोरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्षयरोगाचे रुग्ण विकसनशील देशांमध्ये जास्त संख्येने असून अशियाई व अफ्रीका खंडातील 6 देशांमध्ये 60 टक्के रुग्ण आहेत. यामध्ये एकट्या भारतात 23 टक्के रुग्ण आहेत. रुग्णांच्या संख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे, असे सांगून डॉ. मडके यांनी या आजाराबाबत तळागाळामध्ये प्रभावी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. क्षयरोग हा हवेतून पसरणारा संसर्गजन्य रोग असून बर्लिन येथील सर रॉबर्ट कॉक यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावला. आज 130 वर्ष उलटून गेली तरी टीबीचे जंतू संपूर्णपणे नष्ट झाले नाहीत. क्षयरुग्णाच्या एका तुषारात साधारणपणे 1722 जंतू असतात. एका वर्षात एक थुंकी दुषित क्षयरुग्ण किमान 10 ते 15 नवीन रुग्ण तयार करतो. त्यामुळे रुग्णांना शिकने, खोकणे, थुंकणे या क्रिया करताना कोणती काळजी घ्यावयाची या विषयी व्यवस्थीत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. एचआयव्ही बाधीत रुग्णांना क्षयरोग होण्याची शक्यता 30 पट तर एडस् च्या रुग्णांना क्षयरोग होण्याची शक्यता 200 पट जास्त असल्याचे सांगून शासनाने एमडीआर, एक्सडीआर यासह क्षयरोगाबाबतचे उपचार व औषधे मोफत उपलब्ध करुन दिल्याबद्दल शासनाने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!