
मुंबई:मराठी नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते त्या गुढीपाडव्याचा आनंदोत्सव झी मराठीच्या मालिकांमध्येही बघायला मिळणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकांमध्ये आणि ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये नववर्षाची गुढी उभारण्यात येणार आहे आणि मालिकेला नवं वळणही मिळणार आहे. हे भाग गुढीपाडव्याच्या दिवशी प्रसारीत होणार आहेत
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न बघणा-या आमिर खानने पानी फाउंडेशनच्या माध्यमातून या स्वप्नाच्या दृष्टीने एक आश्वासक पाऊल टाकलं आहे. त्याच्या या कामाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि या चळवळीत लोकसहभाग वाढावा यासाठी आमिर आपल्या टीमच्या सदस्यासह चला हवा येऊ द्या मध्ये सहभागी झाला होता. याच कार्यक्रमात आमिरने आपली पत्नी किरण रावसह मराठमोळी गुढीही उभारली. येत्या २७ आणि २८ मार्चला रात्री ९.३० वा. चला हवा येऊ द्या चे हे दोन्ही भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत
सण समारंभ म्हटलं घरामध्ये रेलचेल असते ती विविध पाककृती बनविण्याची. गोडधोड पदार्थ, चमचमीत रेसिपीज्, खमंग, खुसखुशीत पदार्थ बनविण्याची लगबग घराघरांत बघायला मिळते. यातही प्रत्येक सणाला काही तरी वेगळं आणि खास बनविण्याची इच्छा घरातील सुगरणींना असते. पण हे वेगळं काय यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. आता या सुगरणींच्या मदतीला येणार आहे झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांमधील सासू सुनांच्या जोड्या तेही ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमाच्या माध्यमातून. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये सासू सुनेचा धमाल स्वयंपाक सोहळा रंगणार आहे. येत्या २८ मार्च ते ३१ मार्च दरम्यान दुपारी १.३० वा. झी मराठीवरुन हे विशेष भाग प्रसारीत होणार आहेत.
Leave a Reply