
कोल्हापूर : कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याचे ठोस आश्वासन देऊनही आंदोलन मागे न घेता स्थगित केल्याच्या मुद्यावरून नाराज झालेले ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आंदोलनाचे यापुढे नेतृत्व करणार नाही आणि सहभागी होणार नाही अशी माहिती पत्रकार परिषदेत केली.
प्रा. पाटील म्हणाले की, कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी अनेक वर्षे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिलला विधानभवनात सर्वपक्षीय कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत खंडपीठ स्थापन करण्याबाबत ठोस आश्वासन दिले. त्याचप्रमाणे त्यासाठी आठ दिवसात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे याबाबत पाठपुरावा करण्याचीही ग्वाही दिली. असे असूनही समितीने आंदोलन मागे न घेता ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याबाबत मुख्यमंत्र्यांवर थोडातरी विश्वास दाखविणे आवश्यक होते. हे मला मान्य नसल्याने मी या आंदोलनाचे नेतृत्व यापुढे करणार नाही. यानिमित्ताने वकिलांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचीही टीका त्यांनी केली.पत्रकार परिषदेला विक्रांत पाटील उपस्थित होते.
Leave a Reply