
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकास्तरीय संजय गांधी निराधार व आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना समितीच्या अध्यक्ष पदी शिवसेनेच्या किशोर घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर समितीच्या अन्य सदस्यांचीही नियुक्तीचे आदेश पालकमंत्री मा.ना. चंद्रकातदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मान्यतेनुसार जिल्हाधिकारी मा. अमित सैनी यांनी दिले आहेत. समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदी नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्याच्या सत्कार समारंभाचे आज शिवसेनेनेच्या वतीने शिवालय, शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजेश क्षीरसागर आणि समस्त शिवसेना कार्यकारणीच्या वतीने सर्वांचा भगवा फेटा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला.
यावेळी शिवसैनिकांनी “जय भवानी, जय शिवाजी, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमखू मा.बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो” अशा घोषणांनी शिवालय परिसर दणाणून सोडला.
जाहीर झालेल्या तालुकास्तरीय संजय गांधी निराधार व आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना समितीत ११ सदस्य असून, या समितीच्या अध्यक्षपदी किशोर घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह इतर मागसवर्गीय प्रवर्गातील प्रतिनिधी म्हणून सौ. तेजस्विनी अनिल पाटील, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून सौ. तेजस्विनी मनोज घोरपडे, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी पदी शिवसेना महिला आघाडीच्या माजी शहर प्रमुख सौ.पूजा महेश भोर आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती प्रतिनिधी पदी सागर प्रकाश घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
Leave a Reply