
कोल्हापूर : पं. दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजणेसंदर्भात कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विस्तारक म्हणून विविध ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी काल भाजपा जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संसदेत संमत झालेल्या वस्तू व सेवा कर विधेयकांची माहिती, मागास वर्ग आयोगास केंद्र सरकारने केलेल्या घटनात्मक दर्जाबद्दलची माहिती, ६ एप्रिल भाजपा स्थापना दिनाच्या निमित्याने जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून दिलेल्या योगदानाची माहिती तसेच डिजिटल व्यवहार करण्याकरिता भीम App चा वापर कशा पद्धतीने करावा याचे माहितीपर प्रशिक्षण, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ अभियानासारखे कार्यक्रम अशा प्रकारचे सर्व विषय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याकरिता, समाजातील बुद्धिजीवी व परिवार क्षेत्रातील महत्वाच्या लोकांच्या भेटी आणि संमेलने इत्यादी प्रकारच्या कामांची माहिती देण्याकरिता व पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी कार्यविस्तार योजने संदर्भातील अल्प कालीन विस्तारक १५ दिवसांकरिता व दीर्घ कालीन विस्तारासाठी ६ महिने ते १ वर्षे अशा प्रकारच्या विस्तारकांच्या नावांची यादी निश्चित करण्याकरीता व जिल्हा समितीतील सदस्यांची जबाबदारी म्हणून कार्यविस्तारक सक्रीय करण्याच्या दुष्टीने या बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने विस्तारकांची अंतिम यादी, मंडल पदाधिकारी यादी, जिल्ह्याच्या एक दिवसीय वर्गाला जाणारा प्रदेश पदाधिकारी, या संपूर्ण योजनेवर लक्ष देणारा एक प्रतिनिधी या संदर्भात बैठकीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली.या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोल्हापूर उत्तर/दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून आमदार अमल महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६ ते २४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम व्हावेत अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी या संपूर्ण योजनांची माहिती उपस्थितांना दिली. या संदर्भात पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समितीने आजपर्यंत घेतलेल्या प्रशिक्षण वर्गाची माहिती दिली. पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समितीने संयोजन म्हणून अशोक देसाई, सहसंयोजक श्री हेमंत आराध्ये, संतोष भिवटे व ११ सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी या योजनेसंदर्भातील प्रदेशाकडून मिळालेली माहिती उपस्थितांना सांगितली. या उपक्रमामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी यामध्ये सहभागी व्हावे तसेच महिन्यातून एक कार्यक्रम परिसंवाद आयोजीत करावा असे सांगितले.
आमदार अमल महाडिक यांनी पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी सप्ताह निमित्य विविध कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगून आपण स्वत: आमदार असलो तरी या संपूर्ण प्रशिक्षण वर्गामध्ये आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्व कार्यकर्त्यांसोबत काम करू अशी ग्वाही देत या विषयाची माहिती देत १५ दिवस या अल्पकालीन विस्ताराकासाठी स्वत:चे नाव नोंदवून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.
नगरसेवक अजित ठाणेकर यांनी अल्पकालीन विस्तारक म्हणून जातेवेळी कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याची काय जबाबदारी आहे याची विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी केले.
याप्रसंगी भाजपा सरचिटणीस अशोक देसाई, संतोष भिवटे, सुभाष रामुगडे, गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक श्री अजित ठाणेकर, श्री आशिष ढवळे, संतोष गायकवाड, किरण नकाते, विजय खाडे, नगरसेविका सौ जयश्री जाधव, सौ उमा इंगळे, सौ सविता भालकर, सौ भाग्यश्री शेटके, सौ गीता गुरव, आर.डी,पाटील, संपतराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, मारुती भागोजी, गणेश देसाई, श्रीकांत घुंटे, सौ किशोरी स्वामी, सौ भारती जोशी, राजू मोरे, तौफिक बागवान, नचिकेत भुर्के, सौ प्रभा टिपुगडे, सौ सुलभा मुजुमदार, सौ मधुमती पावनगडकर, हितेंद्र पटेल, मामा कोळवणकर, संतोष माळी, सतीश पाटील, विवेक कुलकर्णी, जयराजसिंह निंबाळकर, दिग्विजय कालेकर, अक्षय मोरे, इंद्रजीत काटकर, रणजीत जाधव, हेमंत कांदेकर, एस.बी.भागवत, दिपक दलवी, विजयमाला जाधव, रजनी भुर्के, कविता पाटील, सुनिता सूर्यवंशी, शोभा कोळी, सौ विद्या म्हमाणे पाटील, निलेश आजगांवर आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply