
कोल्हापूर : जनतेने विश्वासाने तुमची निवड केली आहे, त्याचा आदर राखा आणि जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर रहा, अगदी शेवटच्या माणसाला सुखी समाधानी करा, त्यासाठी सरकराच्या योजना तळागळापर्यंत पोहचवा. योजनेचा लाभ लोकांना मिळेपर्यंत काम केले तरच आतापर्यंत न झालेला विकास साध्य होवून लोक सुखी होतील, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भुदरगड तालुक्यातील मिणचे खु. येथे अनेक वर्षापासून मागणी असणाऱ्या आणि 2 कोटी 70 लाख रुपये खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भुमिपूजन व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सत्कार समारंभ आणि कृतज्ञता स्नेहमेळावा यांचे आयोजन मिणचे खु. येथील श्री काळम्मा देवालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर.व्ही.देसाई होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर), ब्रिदी साखर कारखान्याचे प्रशासकीय संचालक नाथाजी पाटील, पंचायत समिती भुदरगडच्या सदस्या अक्काताई नलवडे, गोकूळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई, सरपंच रणजित देसाई, कोल्हापूर जिल्हा मजूर संघाचे संचालक प्रविण नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जनमतचा आदर राखा, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षांमध्ये शासनानी केलेल्या विविध 28 योजनांचा निधी खर्च होवू शकला नाही. करण त्या योजनाच सर्व सामान्यांपर्यंत पोहचल्या नाहीत. त्यामुळे अगदी शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचविण्यासाठी काम करा.
कर्ज माफीची तयार सुरु-महसूलमंत्री
राज्यामध्ये कृषी कर्जाचा आढावा सुरु करण्यात आला असून कर्ज माफीची तयारी शासनाने सुरु केली आहे. पण याबरोबरच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होवू नये म्हणून शेतकरी सक्षम करण्यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत. असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 2020 पर्यंत प्रत्येकाला घर देण्यासाठी नियोजन करण्यात येत असून विविध 1200 आजारांवर मोफत उपचार करणारी महात्मा ज्योतिराव फुल योजना लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 6 लाख रुपयांपर्यत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांची अभियांत्रिकी व वैद्यक शास्त्रासारख्या अभ्यास क्रमाला जाणाऱ्या सुमारे 5 लाख विद्यार्थ्यांची 50 टक्के फी शासन भरणार आहे. यावर्षी शासनाने 5500 रुपये दराने 30 लाख क्विंटल तुरडाळ खरेदी केली आहे. शेतकऱ्याला उत्पादन वाढीसाठी सर्व सुविधा देण्यात येतीलच पण त्याबरोबरच उत्पादीत मालाला चांगल दरही देण्यात येणार आहे. सोनवडे घाट रस्त्यासाठी 129 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून हे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. तसेच कोल्हापूर गारगोटी रस्त्याचे रुंदीकरण केल्याने प्रवासातील हा वेळीही वाचणार आहे. विकासासाठी शासनाकडे निधीची कमतरता नाही पण विकास तळागाळातळ्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे. यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी 1 लाख कोटी रुपये खर्चुन बुलेट ट्रेनचा प्रकल्पही शासनाने हाती घेतल्योच त्यांनी सांगितले.
यावेळी नुतन जिल्हा परिषद अध्यक्षा व विविध समित्यांचे सभापती, पंचायत समिती स्दस्य यांचे सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
Leave a Reply