
मुंबई:आपल्या अभिनयाने आणि नृत्याच्या अदाकारीने चित्रपट रसिकांची मने जिंकणारी बॉलिवडची मस्त गर्ल अशी ओळख असणारी रविना टंडन आता हिंदी चित्रपटात कम बॅक करत आहे. तिचा ‘मातृ’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने हजेरी लावली ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर. येत्या मंगळवारी १८ एप्रिलला रात्री ९.३० वा. हा भाग प्रसारित होणार आहे. तर सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवुड मंडळींनी हजेरी लावली आणि याच मंचावर आता मस्त मस्त गर्ल रविनासुद्धा येणार आहे. अतिशय संवेदनशील अशा विषयावर आधारित ‘मातृ’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने थुकरटवाडीची वाट धरली यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित होती. यावेळी रविनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला तिने खळखळून दादही दिली आणि कुशल बद्रिके आणि भाऊ कदमसह काही गा्ण्यांवर नृत्याचा ठेकाही धरला. तर पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने तिच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या. एकंदरीत धम्माल मजा मस्तीसोबतच एका संवेदनशिल विषयावर प्रकाश टाकणारा हा भाग येत्या मंगळवारी रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.
Leave a Reply