
मुंबई:संपूर्ण महाराष्ट्राला मायलेकींच्या नात्याच्या प्रवाहात घेऊन जाणारी स्टार प्रवाहवरील ‘लेक माझी लाडकी’ ह्या मालिकेने नुकतेच त्रिशतक म्हणजेच ३०० भाग पूर्ण केले. आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर आधारित असलेल्या या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहे. ३०० भागांचा महत्त्वाचा टप्पा गाठल्यानंतर आता ही मालिका कुठले वळण घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे.
मालिकेचं कथानक अतिशय सहज आणि रंजक पद्धतीनं पुढे जात आहे. मीरा ही आदित्य आणि इरावतीची मुलगी आहे हा खुलासा काही दिवसांपूर्वीच मालिकेत पाहायला मिळाला. पण आता जयदेवच्या अपघातामुळे जर्मनीला निघालेले मीरा आणि आदित्य मागे फिरले. कोमात गेलेल्या जयदेवच्या चेहर्यावरील ऑक्सिजन मास्ककडे आदित्यचा हात सरसावतो. त्यामुळे आदित्य पुढे काय करणार यावर मालिकेतील नात्यांची समीकरण बदलणार कि नवे वळण घेणार ह्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर ह्या जोडीला प्रेक्षकांनी कायमच भरभरून प्रेम दिलेले आहे, या मालिकेच्या माध्यमातून ते अधिक द्विगुणीत झाले आहे असे म्हंटले तर वावगं ठरणार नाही. त्यांच्यासह नक्षत्रा मेढेकर, सायली देवधर, विकास पाटील, सुनील बर्वे, प्रदीप वेलणकर यासारखी उत्तम स्टारकास्ट या मालिकेत आहे. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मायलेकीची ही हळुवार गोष्ट अनुभवण्यासाठी, ‘लेक माझी लाडकी’ ही मालिका पहायलाच हवी सोम ते शनि रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाह वर.
Leave a Reply