
कोल्हापूर: सामाजिक बांधिलकी भावनेतून गेली सोळा वर्षे अविरतपणे सुरु असलेल्या सहजसेवा अन्नछत्राला यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली.दीड लाखाहून अधिक भाविकांनी घेतला याचा लाभ.
एप्रिल महिन्यातील चैत्र पोर्णिमेला श्री केदारलिंग म्हणजेच दख्खनचा राजा श्री जोतीबा यात्रेनिमित्त भक्त लांबून येतात.त्यांच्या सोयीसाठी दरवर्षी सहजसेवा ट्रस्टच्यावतीने अन्नछत्र सुरु असते.अहोरात्र चालणाऱ्या या अन्नछत्रामध्ये लाखो भाविक अन्नाचा लाभ घेतात.यावर्षीही ८ एप्रिल ते ११ एप्रिल या काळात यात्रेनिमित्त अन्नछत्राचे आयोजन केले होते.याचा लाभ यावर्षी दीड लाख लोकांनी घेतला.यासाठी १२ हजार किलो तांदूळ,7 हजार किलो साखर,२६० तेल डबे,2 हजार किलो तुरडाळ,7 हजार लिटर दुध यासह धान्य आणि भाज्या लागल्या.समाजातून भरगोस मदत आली.डोंगरावरील गायमुख येथे भव्य मंडप घालून भक्तांची चोख व्यवस्था केली गेली.यंदा अन्नछत्राचे हे १७वे वर्ष आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शासन अधिकारी,कर्मचारी यांच्यसह अनेक संस्था,गावातील मंडळे यांची मदत झाली.अशी माहिती विश्वस्थ संन्मती मिरजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तसेच रक्तदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.याचे वैशिष्ठ म्हणजे कोल्हापूर जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने रक्तदान करण्यासाठी वातानुकुलीत आणि आधुनिक वोल्व्हो बस उपलब्ध करण्यात आली होती.यावर्षी ४३५ युनिट संकलित झाले.असे रक्तपेढी विभाग प्रमुख संदीप साळोखे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला प्रमोद पाटील,सुर्यकांत गायकवाड,सीपीआर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद उपस्थित होते.
Leave a Reply