
कोल्हापूर: कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच सर्व सभासद्तून निवड प्राक्रिया पार पडली.यात २१५ सभासदांपैकी १९२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत सामना,सकाळ,पुढारी,पुण्यनगरी आणि तरुण भारत यांचे अनुक्रमे शीतल धनवडे,लुमाकांत नलवडे,सतीश सरीकर,सुखदेव गिरी नी कृष्णात चौगले हे उमेदवार रिंगणात उतरले.सकाळी ठीक ११ वाजता मतदानास सुरुवात झाली.एकूण ९० टक्के मतदान झाले.त्यानंतर ४ च्या दरम्यान मावळते अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ५४ मते घेऊन लुमाकांत नलवडे विजयी झाल्याचे घोषित केले.यात सरीकर यांना ४४ ,धनवडे यांना ३५,गिरी यांना ३६ आणि चौगले यांना २१ मते मिळाली.संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांच्यासह विश्वास पाटील,राहुल खाडे,सुरेश आमबुसकर,अश्विनी टेंबे आणि श्रद्धा जोगळेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले.येत्या 22 तारखेला नूतन कार्यकारिणी बैठक होणार असून त्यात इतर पदे निवडली जाणार आहेत.
Leave a Reply