
कोल्हापूर: पंचगंगा स्मशानभुमी येथे बसविण्यात येणाऱ्या गॅस दाहिनीचे सादरीकरण आज महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांचेसमोर आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेस बडोदा येथील अल्फा इक्वीप्मेंट कंपनी नि:शुल्क गॅस दाहिनी बसवून देणार आहे. या गॅस दाहणीसाठी कंपनीकडून अंदाचे 32 लाख इतका खर्च करण्यात येणार आहे.
बडोदा येथील अल्फा इक्वीपमेंटचे विहंग चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे विविध गॅस दायिनीच्या कार्यपध्दतीची माहिती दिली. यामध्ये त्यांनी डिझेल व विद्युत दाहीणी यामधील फरक सांगितला. यामध्ये गॅस दाहिनीसाठी कमी खर्च, दुरुस्ती खर्च कमी, 10 एचपी पॉवर वीज लागते तसेच विद्युत दाहीनीसाठी 80 कि.व्हॅट पॉवर इतकी वीज 24 तास लागते असे सांगितले. गॅस दायिनी फुल ऍ़टोमॅटिक, गॅस कंट्रोल पॅनल, हायड्रोलिक ट्रॉली, 20 सिलेंडरचा फोल्डर अशी रचना असणार आहे. या गॅस दाहिनीसाठी कंपनीने पाच वर्षांची वॉरंटी दिली आहे. या प्रकारच्या दाहिन्या गुजरातमधील विविध शहरात मोठया प्रमाणात बसविण्यात आलेचे सांगितले.
सद्या स्मशानभुमीमध्ये एका मृतदेह दहन करणेसाठी 150 किलो लाकूड लागते. या पध्दतीत मोठया प्रमाणात रक्षा निर्माण होते. तसेच किमान रु.1200/- ते 1400/- खर्च येतो. गॅस दायिनीमध्ये मृतदेहांची संख्या वाढेल तसे दहनासाठी लागणारा खर्च कमी होईल. या दाहिनीमध्ये राखेचे प्रमाण अत्यल्प असते असे सांगितले.
लोकांच्या भावना लक्षात घेता कंपनीने लाकडावर आधारीत दाहनीही तयार केली आहे. यामध्ये आता लागणाऱ्या लाकडाच्या खर्चात 50 टक्के बचत होणार आहे. महापालिकेच्या कचरा प्रक्रियेपासून निर्माण होणारा ऑरगॅनिक गॅसचा वापर फिल्टर करून यासाठी उपयोगात आणता येईल असे सांगितले.
महापौर सौ.हसिना फरास यांनी बोलताना अंत्यसंस्कार करताना स्मशानभुमीवर जागा कमी पडत आहे. अल्फा इक्वीप्मेंट कंपनीने नि:शुल्क देणार असलेल्या गॅस दाहिनीमध्ये 100 टक्के मृतदेह दहन होणार आहे. त्यामध्ये राखेचे प्रमाण अत्यल्प राहणार असून धुराचे प्रमाणही कमी होईल. ही गॅस दाहिनी एैच्छिक असून ज्यांना त्याठिकाणी अत्यंसंस्कार करावयाचा आहे त्यांनी तेथे अत्यंसंस्कार करावे.
बैठकीनंतर महापौर सौ.हसिना फरास, स्थायी समिती सभापती डॉ.संदिप नेजदार, महिला बालकल्याण समिती सभापती सौ. वहिदा सौदागर, सभागृहनेता प्रविण केसरकर, उपआयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अल्फा इक्वीपमेंटचे कंपनीचे विहंग चव्हाण, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील यांनी पंचगंगा स्मशानभुमीस भेट देवून गॅस दाहिनीसाठी लागणाऱ्या जागेची पाहणी केली.
Leave a Reply