
कोल्हापूर:मराठा समाज आरक्षण, तसेच अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज कोल्हापुरात गोलमेज परिषद झाली. या परिषदेत महाराष्ट्रातून सदस्य सहभागी झाले होते.न्याय्य हक्कांसाठी मराठा समाजाने महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने शांततेत ५८ महामोर्चे काढले. यानंतर नागपूर व मुंबई येथेही भव्य मोर्चे काढले; पण सरकारकडून सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय झाला नाही. त्यानुसारच आज सकल मराठा समाज क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने महागोलमेज परिषदेचे आयोजन मुस्कान लॉन येथे करण्यात आले होते.
परिषदेत मराठा समाज आरक्षणाबरोबरच,शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी,अखंडित विज पुरवठा झाला पाहिजे,शेतकऱ्यांच्या हिताचे आयात निर्यात धोरण सरकारने राबवावे, शेतीमालास हमीभाव,मिळाला पाहिजे,डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफरशी लागु कराव्यात,मराठा उद्योग गट स्थापन करणे आणि मराठा आरक्षण मिळलेच पाहिजे तसेच मराठा क्रांती मोर्च्यातील सर्व अटींना मान्यता देणे या मुद्यांवर चर्चा झाली.आणि याबाबतचे ठराव मंजूर करण्यात आले. याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाला समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा दिला पण ठोस असे नेतृत्व नाही यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.सकल मराठा समाजाचे नेतृत्व कोणतेही राजकीय संघटन करत नाही. भविष्यात संघटनेच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर कोणी चर्चा करणे,आचारसंहिता ठरविणे आणि पुढील कार्यवाही या समितीद्वारे होणार आहे. मराठा समाजाने हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा मागणी नको यासाठी प्रबोधन करणे, ‘कोपर्डी’सारखे अत्याचार पुन्हा होऊ न देणे यासह १७ ठराव मंजूर करण्यात आले.रायगड येथे शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याचा निषेध करण्यात आला.१० आणि ३० मे रोजी कोणताही मोर्चा मराठा समाजाच्या वतीने जाहीर केलेला नाही असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी अध्यक्ष राजीव पाटील,उपाध्यक्ष जयेश कदम,सचिव राजीव लीन्ग्रस,दिलीप देसाई.दिलीप पाटील,उमेश पोवार,रमेश पोवार,विजय जाधव यांच्यासह विविध संघटना प्रतिनिधी,आयोजक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply