पुढचं पाऊल’मध्ये येणार नवी कल्याणी?

 

मुंबई:गेली पाच वर्षं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलेल्या पुढचं पाऊल या स्टार प्रवाहवरील मालिकेत आता प्रेक्षकांना नवा धक्का बसणार आहे. कल्याणीच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या अक्कासाहेबांच्या कुटुंबात नवी कल्याणी येणार आहे.
बाब्याने घेतलेल्या बदल्यात झालेला कल्याणीचा मृत्यू अक्कासाहेब पचवू शकलेल्या नाहीत. कुटुंबातील कुणीच कल्याणीची जागा घेऊ शकत नाही असे त्यांचे मत असते. इतके दिवस तत्वाला धरून वागणाऱ्या अक्कासाहेब, आता व्यावहारिक होण्याचे ठरवतात. तत्वाला धरून वागून काही उपयोग झाला नाही,म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला असतो. अक्कासाहेबांच्या या नव्या रूपानं कुटुंबातील प्रत्येकजण अवाक् झाला आहे. इतक्यातच समीर कल्याणी नावाच्या एका बारडान्सरला भेटतो आणि त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळते.
आता ही नवी कल्याणी कोण आहे, तिचा नक्की हेतू काय, समीर- कल्याणीच काही नवे नाते तयार होईल का ?, अक्कासाहेब याबाबत काय भूमिका घेतील ? असा उत्कंठावर्धक कथानकाचा प्रवास ‘स्टार प्रवाह’च्या ‘पुढचं पाऊल’ मध्ये घडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!