
कोल्हापूर: सकल मराठा समाजाचे वंचित प्रश्न यावर चर्चा तसेच आरक्षणाच्या मुद्यावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांचे व्याख्यान तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधीना आमंत्रित करून त्यांना मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत सखोल चर्चा घडविण्यासाठी जिल्ह्यातील पहिली मराठा आमसभेचे आयोजन येत्या ३० एप्रिल रोजी शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड येथे केले जाणार आहे अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमसभेत प्रामुख्याने मराठा आरक्षण,मराठा आचारसंहिता आणि मराठा स्वराज्य भवन यावर चर्चा होऊन आरक्षणाचा आतापर्यंतचा आढावा घेण्यात येणार आहे.
आमसभेसाठी छत्रपती शाहू महाराज,माजी राज्यपाल डी.वाय.पाटील,शिक्षण तज्ञ डी.बी.पाटील,पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,खासदार धनंजय महाडिक,आमदार सतेज पाटील,आम.राजेश क्षीरसागर,खासदार संभाजीराजे छत्रपती,आमदार चंद्रदीप नरके,आमदार सुरेश हलवणकर,आमदार सुजित मिनचेकर,संध्यादेवी कुपेकर,सत्यजित पाटील,अमल महाडिक,महापौर हसीना फरास यांच्यासह सर्व क्षेत्रातील राजकीय प्रतिनिधी,मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे. मराठा भवन साठी जागेची मागणी शासनाला केली असून शैक्षणिक संकुल आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणी करण्याचा मानस आहे असेही मुळीक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महिला अध्यक्षा शैलजा भोसले,डॉ.शिवाजीराव हिलगे,चंद्रकांत चव्हाण यांच्यासह मराठा संघाचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply