
कोल्हापूर: तब्बल साडे बावीस किलो वजनाची सुवर्ण पालखीचा श्री महालक्ष्मी चरणी अर्पण सोहळा येत्या 1 मे रोजी तीन पीठाचे शंकराचार्य ,छत्रपती शाहू महाराज,पालखी स्विकारण्यासाठी देवस्थान समिती अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार,उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.लोकसहभागातून या पालखीसाठी सोने संकलन सुरु होते.२०१५ साली लोकांना आवाहन केल्यानंतर लोकांनी आपल्याला जमेल तसे सोने दान करण्यास सुरुवात केली.२०१७ साली अखेर तो ऐतिहासिक क्षण आला.1 मे रोजी सायंकाळी 5 वाजता या सुवर्ण पालखीचा हस्तांतरण सोहळा पार पडणार आहे.यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,प्रथम नागरिक हसीना फरास,श्रीपुजक आणि देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित रहाणार आहेत.पालखी हस्तांतरण नंतर महाआरती होणार आहे.तरी हजारो भाविकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply