कृषिपंपाच्या वीज दरवाढी विरोधी १५मे रोजी धडक मोर्चा : प्रा. एन डी पाटील

 

कोल्हापूर: सहकारी पाणी पुरवठा संस्था यांच्या कृषिपंपाच्या वीज बिलात महावितरण कंपनीने दरवाढ केली आहे. आधीच्या दरवाढीबाबत निर्णय प्रलंबित असताना देखील परत नवीन दरवाढ केल्याने हि दरवाढ शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक आहे. बंद मीटरवर आकारणी करुणे तसेच काही शेत पंपावर मीटर न बसवता मनमानी कारभार करत असल्याने महावितरणची हि चालेली लबाडी आम्ही खपवून घेणार नाही या विरुद्ध आवाज उठण्यासाठी येत्या १५ मे रोजीदुपारी २ वाजता कोल्हापूरतील महावितरण कार्यालयावर सर्व पक्षीय धडक मोर्चा करण्यात येणार आहेअशी माहिती प्राचार्य डॉ. एन डी पाटील यांनी दिली.

कृषिपंप धारकांच्या २२ पैसे प्रती युनिट वाढीव दराबाबतसहकारी पाणी पुरवठा संस्थाप्रायांच्या डॉ. एन डी पाटीलयांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांचे महावितरण आणि राज्य शासन यांच्यामध्येवाद सुरु असून याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नसताना देखील परत कृषिपंपाच्या वीज बिलात १ नोव्हेंबर २०१६ पासून रु. ६५ पैसेची वाढ केली आहे. १.१६ प्रती युनिट दर वाढवून १.८१ पैसे केला आहे. आधीची दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नसताना देखील परत दरवाढ करून शेतकऱ्यांचावर अन्याय केला जात आहे. १७ लाख ग्राहकांना कृषीपंप बसवले गेले नाहीत तसेच ज्या गावात टॅकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या गावात वर्षाला १६०० तास पंप चालते असे भासवून वाढीव बिल आकारणी केली जाते. खरा वीज वापर निश्चित न करता मनमानी कारभार केला जात आहे हे शेतकऱ्याच्यावर अन्यायकारक आहे वीज दर दुप्पट करण्याच्या मार्गावर महावितर आहे. राजकीय पक्ष स्वताच्या फायद्याचे राजकारण करत आहे. तरी या दरवाढी विरुद्ध जनजागृती करण्यात येणार आहे. विविध मेळावे, घेराओ, मोर्चे काढ्यात येणार आहेत यातीलच एक भाग म्हणून १५ मे रोजी दुपारी 2 वाजता कोल्हापुरातील महावितरणवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी यामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. एन डी पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!