
कोल्हापूर : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देणारे कार्यक्रम यंदा कोल्हापूर वासियांना अनुभवता येणार आहेत. याचे निमित्त आहे गेल्या सहा वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेलाकोल्हापूरचा महोत्सव “भगिनी महोत्सव”. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीने सलग ७ व्या वर्षीत्याच रंगात आणि त्याच जल्लोषात “भगिनी महोत्सव २०१७” चे भव्य आयोजन “छ. शाहू खासबाग मैदान” मंगळवार पेठ कोल्हापूर येथे दि. २९, ३० एप्रिल आणि १ मे २०१७ रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवाकरिता खासबाग मैदान येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. भगिनी महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ठ असलेल्या बचत गटांच्या स्टॉलची मांडणी, भव्य स्टेज, स्वागत कमानी आदीद्वारे भगिनी महोत्सवाची जय्यत तयारी करणेत आली आहे. महिलांच्या ध्येय निश्चिती करिता, विविध क्षेत्रामध्ये गगन भरारी घेण्याकरिता एक आदरणीय व्यक्तीचे अनुकरण त्यांनी करावे, याच प्रयत्नातून सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या अमूल्य कार्याचा आढावा घेत आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेल्या सिने, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि चळवळीतील पाच महिला भगिनींना “भगिनी पुरस्कार” ने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप रोख रु.११ हजार, मानपत्र, भगवा फेटा, शाल- श्रीफळ असे असते.अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.या महोत्सवाचे खास उद्दिष्ट म्हणजे महिलांना स्वावलंबी बनविणे, या उद्दिष्टात भगिनी मंच सफल होताना दिसत असून, गेल्या ६ वर्षातील भगिनी महोत्सवास महिला बचत गटांचा वाढता प्रतिसाद याची पोहच पावती देते. या महोत्सवामध्ये सुमारे १०० महिला बचत गटांना मोफत विक्री स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याद्वारे महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना या तीन दिवसात बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम भगिनी मंचच्या वतीने करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार दि. २९ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता छ. शाहू खासबाग मैदान, कोल्हापूर येथेकोल्हापूरच्या महापौर सौ. हसीना फरास यांच्या हस्ते तरपालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याकरिता सामाजिक, सांकृतिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन समारंभानंतर “स्त्री भृण हत्या आणि महिलांवरील अत्याचार थांबवा” अशा आशयाचा संदेश देनेत येणार आहे. यानंतर विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेवून समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्या १०० भगिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या सांकृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमाची सुरवात होणार आहे लहान मुलांच्या “फॅन्सी ड्रेस” या स्पर्धेने. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशीच दुपारी ४.०० ते ७.०० या वेळेमध्ये लहान मुलांच्या या “फॅन्सी ड्रेस” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर महोत्सवाची धुमधडाक्यात सुरवात करण्याकरिता सिने अभिनेत्री अमृता खानविलकर सह अनेक लावण्यवती “लावण्यखणी” या खास महिलांसाठी आयोजित लावण्यांच्या कार्यक्रमाने करणार असून, अमृता खानविलकर सह लावण्यवतींचा डान्स कोल्हापूर वासियांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता “लावण्यखणी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले. भगिनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी १०.०० ते २.०० या वेळेमध्ये अभिनेते आणि हास्य कलाकार योगेश सुपेकर यांच्या “सौभाग्यवती” या महिलांच्या स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले असून, विविध खेळातून सरस ठरणाऱ्या १० भगिनीमध्ये अंतिम फेरी साठी पात्र ठरणार असून सर्वात सरस असणारी भगिनी “भगिनी कोल्हापूरची २०१७” च्या आकर्षक बक्षिसाची मानकरी ठरणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकाना अनुक्रमे एल.सी.डी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रो ओवन, फ्रूड प्रोसेसर अशी भरगोस बक्षिसे दिली जाणार आहेत. तर सहा ते दहा क्रमांकाच्या स्पर्धकांनाही आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे. यानंतर गेली सहा वर्षे कोल्हापुरातील महिला आणि युवतींनी भरभरून सहभाग दिलेल्या आणि ज्याचे कोल्हापूरवासियांना आतुरता असते अशा “मिस भगिनी आणि मिसेस भगिनी २०१७” या महिला आणि युवतींच्या सौंदर्य स्पर्धेचे सायं ५.०० ते ७.०० या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्या स्पर्धकावर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. स्पर्धेतीलविजेत्या मिस आणि मिसेस भगिनीला “मिस/ मिसेस भगिनी २०१७” चा किताब, सुवर्ण मुकुट आणि प्रथम क्रमांकाचे एल.सी.डी, टीव्ही हे बक्षीस देनेत येणार आहे. त्याच बरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या विजेत्या स्पर्धकास अनुक्रमे फ्रीज, वॉशिंग मशीन आणि मुकुट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर चला हवा येऊ द्या फेम “सागर कारंडे व भारत गणेशपुरे”, हिंदी- मराठी सिने जगातील प्रसिद्ध अभिनेत्री झी मराठी वरील “कुंकू” या मालिकेची नायिका “मृणाल देशपांडे”, “माझा होशील का” या मालिकेची नायिका “सिद्धी कारखानीस”, “मेहंदीच्या पानावर” मालिकेची नायिका “अक्षया गुरव” “जोकर व बाजी” या सिनेमा करिता पार्श्वगायन करणारे गायक “आदर्श शिंदे”, “धावा-धाव, संघर्ष” आदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत ठसा उमटवणारी अभिनेत्री “माधवी निमकर”, “भाग्यलक्ष्मी, पिंजरा, तू तिथ मी, गंध फुलांचा गेला वाहून” आदी मालीकांसह “शिकारी, व्हॉट अबाउट सावरकर ” या चित्रपतातून सारीकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री “सारा श्रवण” आदी स्टारकास्टनी भरलेल्या “धुमधडाका” या गायिकी, विनोद आणि नृत्य या तिन्हीची सांगड घालणाऱ्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे सायंकाळी ७.०० वाजता आयोजन करण्यात आले असून, या कलाकारांच्या व तारकांच्या दिलखेचक अदाकारीची मेजावाजीच रसिकांना मिळणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवार दि. ०१ मे २०१७ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेमध्ये महिलांच्या पारंपारिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये झिम्मा – फुगडी, उखाणे, घागर घुमविणे, सूप नाचविणे या स्पर्धां पार पडणार आहेत. यातील विजेत्या महिलांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विविध पारंपारिक खेळामध्ये सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. यानंतर महोत्सवाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये “भगिनी पुरस्कार २०१७” चा वितरण सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचे वितरण गृह राज्य मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या हस्ते नूतन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापौर सौ. हसीना फरास, जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. यानंतर तीन दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये विजेत्या ठरलेल्या विजेत्यांना आकर्षक किमती बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता दि. ०१ मे या “महाराष्ट्र दिनास” अनुसरून खास मराठी संकृतीच्या सादरीकरणाने होणार असून, रसिक पेक्षकांना महाराष्ट्राच्या मातीची, संकृतीची, सणांची, महाराष्ट्राच्या विविध रूपांची माहिती करून देणाऱ्या “गुडी महाराष्ट्राची” या सांकृतिक कार्यक्रमाने होणार आहे.अशी माहिती भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी दिली.
Leave a Reply