
कोल्हापूर : एलीझाबेत एकादशी या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडीओ यांचा ‘ची व ची. सौ. का.’ हा चित्रपट १९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
झी स्टुडीओ निर्मित परेश मोकाशी दिग्दर्शित ‘सत्यप्रकाश – सावित्रीचा हा लग्नसुडोकू मधुगंधा कुलकर्णी यांच्या लेखणीतून हा चित्रपट साकारला आहे. कथा पटकथा व संवाद देखील परेश मोकाशी यांचे आहे. लग्नबंबाळ, धमाल गोतावळा तसेच सत्यप्रकाश आणि सावित्रीच्या नात्यांचे उलगडत जाणारे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारी गोष्ट आहे. चित्रपट अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत. लग्नासाठी एकत्र येताना घडणाऱ्या घटनाच्यावर आधारित गोष्ट आहे. निखील साने यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात दोन गाणी असून श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गाणी स्वरबद्ध केली असून स्वानंद किरकिरे यांनी गायिले आहे. या चित्रपटात सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, सतीश आळेकर, शर्मिष्ठा राऊत, भारत गणेशपुरे, ज्योती सुभाष, यांच्या भूमिका आहेत.
Leave a Reply