
कोल्हापूर : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देत कोल्हापूर वासियांना मंत्रमुग्ध करीत भगिनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिने कलाकारांनी धुमधडाक्यात आपली कला सादर केली. गेल्या सहा वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेला कोल्हापूरचा महोत्सव “भगिनी महोत्सव”. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीनेसलग ७ व्या वर्षी त्याच रंगात आणि त्याच जल्लोषात “भगिनी महोत्सव २०१७” चे भव्य आयोजन “छ. शाहू खासबाग मैदान” मंगळवार पेठ कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला सिने अभिनेत्री अमृता खानविलकर हिने “वाजले कि बारा” या गाण्यावर नृत्यअविष्कार दाखवून करवीर वासियांना गाण्याच्या तालावर नाचण्यास भाग पाडले. खास महिलांकरीता आयोजिलेल्या “लावण्याखणी” या कार्यक्रमामध्ये सुप्रिया कुंभार, चतुर्थी पुणेकर, स्वप्नाली बार्शीकर, भाग्यश्री कदम मुंबईकर या लावण्यावातीनी आपल्या अदाकारीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. भगिनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज सकाळी १०.०० ते २.०० या वेळेमध्ये अभिनेते आणि हास्य कलाकार योगेश सुपेकर यांच्या“सौभाग्यवती” या महिलांच्या स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका माधुरी लाड, नगरसेविका सूरमंजिरी लाटकर, नगरसेविका सुरेखा शहा, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, नगरसेविका सरिता मोरे, नगरसेविका उमा बनछोडे, नगरसेविका भाग्यश्री शेटके, नगरसेविका सुनंदा मोहिते, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, नगरसेविका माधवी गवंडी, नगरसेविका जयश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या स्पर्धेमध्ये संगीत खुर्ची, बॉल- बकेट, फुगे फोडणे, अशा स्पॉट गेम मधून पहिल्या दहा स्वर्धाकांची निवड करण्यात आली. या दहा स्पर्धकांमध्ये झालेल्या अंतिम फेरीत सौ. अर्पिता अर्चित राबाडे या सर्व स्पर्धकांवर मात करीत सौभाग्यवती स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. त्याच बरोबर स्पर्धेतील विजेत्या असणाऱ्या स्पर्धाकासाठी असणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या बक्षीस एलसीडी टीव्ही च्या मानकरीही झाल्या. या स्पर्धेमध्ये द्वितीय ते पाच क्रमांक मिळविलेल्या स्पर्धक अनुक्रमे सौ. वैशाली हेमंत काळोखे, सौ.निर्मला रणजीत राउत, सौ. सविता दीपक चव्हाण, सौ. सोनाल महेश जाधव, या मानकरी ठरल्या. या पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकाना अनुक्रमे एल.सी.डी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रो ओवन, फ्रूड प्रोसेसर अशी भरगोस बक्षिसे दिली जाणार आहेत. तर सहा ते ध क्रमांकाच्या विजेत्या अनुक्रमे सौ. अनिता महादेव टिपुगडे, सौ. ज्योती जयेंद्र पन्हाळकर, सौ. बबिता राजकुमार पंडित, सौ. सुजाता बाळासो मंगाजे, सौ.गीता मोहन कामते याना टोस्टर बक्षीस देनेत येणार आहे. गौरविण्यात येणार आहे.
यानंतर गेली सहा वर्षे कोल्हापुरातील महिला आणि युवतींनी भरभरून सहभाग दिलेल्या आणि ज्याचे कोल्हापूरवासियांना आतुरता असते अशा “मिस भगिनी आणि मिसेस भगिनी २०१७” या महिला आणि युवतींच्या सौंदर्य स्पर्धेचे सायंकाळी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन कोल्हापूर वासिनाच्या टाळ्यान्ची दाद मिळविणाऱ्या “कोमल साजरे ” हि मिस भगिनीची तर “ हर्षदा पाटील” या मिसेस भगिनी ठरल्या. स्पर्धेतील विजेत्या मिस आणि मिसेस भगिनीला “मिस/ मिसेस भगिनी २०१७” चा किताब, सुवर्ण मुकुट आणि प्रथम क्रमांकाचे एल.सी.डी, टीव्ही हे बक्षीस देनेत येणार आहे. त्याच बरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या विजेत्या स्पर्धकास अनुक्रमे फ्रीज, वॉशिंग मशीन आणि मुकुट देऊन सन्मानित करण्यात आले.यानंतर भगिनी महोत्सवाचा सर्वात आकर्षण असलेल्या धुमधडाका या कार्यक्रमास महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये चला हवा येऊ द्या फेम “सागर कारंडे व भारत गणेशपुरे”, हिंदी- मराठी सिने जगातील प्रसिद्ध अभिनेत्री झी मराठी वरील “कुंकू” या मालिकेची नायिका “मृणाल देशपांडे”, “माझा होशील का” या मालिकेची नायिका “सिद्धी कारखानीस”, “मेहंदीच्या पानावर” मालिकेची नायिका “अक्षया गुरव” “जोकर व बाजी” या सिनेमा करिता पार्श्वगायन करणारे गायक “आदर्श शिंदे”, “धावा-धाव, संघर्ष” आदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत ठसा उमटवणारी अभिनेत्री “माधवी निमकर”, “भाग्यलक्ष्मी, पिंजरा, तू तिथ मी, गंध फुलांचा गेला वाहून” आदी मालीकांसह “शिकारी, व्हॉट अबाउट सावरकर ” या चित्रपतातून सारीकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री “सारा श्रवण” आदी स्टारकास्टनी भरलेल्या “धुमधडाका” या गायिकी, विनोद आणि नृत्य या तिन्हीची सांगड घालणाऱ्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमानेकलाकारांच्या व तारकांच्या दिलखेचक अदाकारीची मेजावाजीच रसिकांना दिली.
Leave a Reply