कोल्हापूर विभागाचा 91.40 टक्के निकाल, राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; यावर्षी राज्यातील निकालात 3 टक्के वाढ

 

कोल्हापूर : आज उच्च माध्यमिक परीक्षा बारावीचा ऑनलाईन निकाल जाहिर झाला. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याचा ९१.६३ टक्के निकाल यात मुले ८५.७३ टक्के तर मुली ९५.५७ टक्के प्रमाण जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत.राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुलींनीच बाजी मारली असून यावर्षी राज्यात मुलांचे ८४.९२ % आणि मुलिंचे ९५.४१% प्रमाण आहे.तुलनात्मक स्थितिनुसार यंदा १०.५० %नी मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे.मागील वर्षीपेक्षा हे प्रमाण ६%नी अधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ३.३०% नी वाढ झाली आहे.विभागनिहाय निकाल बघता
राज्याचा एकूण निकाल – 89.50%
मुलं – 86.65%
मुली – 93.05%
कोकण – 95.20%
लातूर – 88.22 %
नाशिक – 88.22%
अमरावती – 89.12%
कोल्हापूर – 91.40%
मुंबई – 88.21%
औरंगाबाद – 89.83%
नागपूर – 89.05%
पुणे – 91.16%
असा असून कोकण विभाग प्रथम,कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विज्ञान शाखा 97.77%
कला शाखा 81.32%
वाणिज्य शाखा 95.25%
व्यवसाय विषयक 90.08% असा शाखानिहाय निकाल आहे.
मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जास्त आहे हे खरच अभिनंदनीय गोष्ट आहे असे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी सांगितले.कॉपी मुक्त अभियान यशस्वीरित्या राबविले आहे.असेही ते म्हणाले. विद्यार्थ्याना गुणपत्रिका शुक्रवारी 9 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहेत.गुण पडताळणीसाठी 31 मे ते 9 जून पर्यन्त मुदत असून 31 मे ते 19 जून पर्यन्त उत्तरपत्रिका छायांकन प्रत विभागीय मंडळाकड़े मिळेल.कोल्हापूर विभागात 763 कॉलजमधिल 1,26,761 विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून त्यातील 1,15,863 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यांचे प्रमाण 91.40% आहे.तर राज्यात 14 लाख 29 हजार 478 विद्यार्थ्यांपैकी 12 लाख 79 हजार 406 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.राज्याचा एकूण निकाल 89.50%इतका लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!