
कोल्हापूर: तंबाखूच्या व्यसनामुळे मोठ्या प्रमाणात तोंड,घसा तसेच रक्ताचा कॅन्सर त्याचप्रमाणे त्या अनुशांगाने अनेक आजाराच्या विळख्यात अडकून मृत्यू आणि परावलंबित्व येते.तंबाखू हे व्यसन त्या व्यक्तीला मृत्यू पर्यंत घेऊन जाते.म्हणूनच तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ३१ मे जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित ब्रह्माकुमारीच्यावतीने समुपदेशन व तंबाखूचे व्यसन सुटण्यासाठी मोफत तपासणी तसेच त्यावर मोफत होमिओपॅथिक औषधोपचार यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. ब्रह्माकुमारीच्या पीस पॅलेस,तटाकडील तालीम गल्ली शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे सकाळी १० ते ५ यावेळेत ही तपासणी तज्ञ डॉक्टर्स कडून करण्यात येणार असून संबंधितानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मा कुमारीच्या सुनंदा बेहेनजी यांनी केले आहे. तसेच ०२३१-२६२९४२१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ब्रह्माकुमारीच्या वतीने केले आहे.
Leave a Reply