
कोल्हापूर : कोल्हापूरची आई अंबाबाई ही साडे तीन शक्ती पिठापैकी एक आहे. मूर्तीच्या संवर्धनाचा विषय सध्या ऐरणीवर आहे.भक्त आणि देवीचे भाविक यांच्यातुनही आता संताप व्यक्त होत आहे.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या आई अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनात राजकारण खेळले जात आहे.त्याचबरोबर अर्थकारण सुरु झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पुरातत्व खात्याकडून याचा पूर्ण खुलासा झाला पहिजे,नाहीतर शिवसेना गप्प बसणार नाही असा ईशारा आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला.या संबंधित आज शिवसेनेने आंदोलन छेडले आणि देवस्थान समितीचे सह सचिव एस.एस.साळवी यांना याबाबत निवेदन देण्यात आले. श्री अंबाबाई देवीविषयीचे राजकारण शिवसेना खपवून घेणार नाही. देवी कोणाची खासगी मालमत्ता किंवा प्रयोगशाळा नाही. पूर्वी मोगलांशी लढावे लागले आणि आता पुरातत्त्व खात्याशी देवीच्या मूर्तीसाठी लढावे लागत आहे. श्री जोतिबा, श्री पांडुरंग या देवतांच्या मूर्त्या दर्जात्मक झाल्या आहेत मग अंबाबाईच्या बाबतीत असे का? मंदिराच्या अनेक वेळा नियम अटींचे उल्लंघन करून देवीचे पावित्र्य कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. देवस्थान समिती यावर कारवाई का करत नाही? अर्ध्या मूर्तीचे संवर्धन का? दर्जाबाबतीत १०० वर्षाची हमी दिली होती का? संवर्धन झाल्यावर कोणत्या नियम, अटी सुचवल्या होत्या काय? आणि ते पाळले जाते काय? सीआयडी चौकशी कोणाला वाचवण्यासाठी ठप्प करण्यात आली? असे प्रश्न उपस्थित करून उद्या मंदिरात संबंधित पुरातत्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी मूर्ती पाहणीस येणार आहेत तेंव्हा त्यांच्या सोबत शिवसैनिकांची बैठकीचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी आज निवेदन देताना करण्यात आली.
या वेळी देवस्थान समितीच्या संगीता खाडे यांच्यासह शहर प्रमुख शिवाजीराव जाधव,उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, रवी चौगले, हर्षल सुर्वे, राजेंद्र जाधव, शशिकांत बिडकर, अवधूत साळुंखे, राजू यादव, विनोद खोत, दिलीप देसाई, राजेंद्र पाटील, रणजीत आयरेकर, मनजित माने, शुभांगी पोवार, दिपाली शिंदे, सुनीता निकम, कमल पाटील, सुनील पोवार, भगवान कदम,प्रवीण पालव आणि शिवसैनिक उपस्थित होते.
Leave a Reply