
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हयात घालवलेले माजी आमदार बाबुराव धारवाडे यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. ते 88 वर्षाचे होते.
कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून 1942 पासून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 11 वर्षे काम पाहिले. 1985 मध्ये विधान परिषदेवर त्यांची निवड झाली. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती.
Leave a Reply