
कोल्हापूर: शेतकरी संपाने आता अधिक आक्रमक रूपधारण केलं आहे. आंदोलनाचा तोडगा निघाला नाहीतर 5 जूनला महाराष्ट्र बंदचा इशारा शेतकरी कोअर कमिटीने दिलाय. तसंच 6 जूनला सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार आणि 7 जूनपासून आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही कमिटीने दिलाय.त्यांच्या कार्यलायदेखिल टाळे ठोकनार आहे असेही कमिटिने सांगितले आहे.
आज संपाच्या दुसऱ्या दिवशी पुणतांबात ग्रामपंचायतीची बैठक पार पडली. सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकरी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आलीये. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर या 5 तारखेला महाराष्ट्र बंद करणार, ६ तारखेला सर्व सरकारी कार्यालयांना टाळ ठोकणार आणि ७ तारखेला आमदार खासदारांच्या कार्यालयांना कुलूप लावणार एवढंच नाहीतर ७ तारखेनंतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही असा इशारा या समितीने सरकारला दिलाय.
Leave a Reply