
कोल्हापूर : पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे पार पडले. यावर्षी गुळाला 2300 पासून सौद्याची सुरुवात होऊन गुणवत्तेप्रमाणे 2800 रुपयांपर्यंत दर देण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातील गुर्हाळघरे या हंगामात सुरु झाली आहेत.पुन्हा शेतकरी कामास लागले आहेत.आज जिल्ह्यातल्या गुळ कित्येक उत्पादक शेतकर्यांनी गुळ सौद्यासाठी आणला. व्यापार्यांनीही गुळ खरेदीला चांगला प्रतिसाद दिला खरा पण बळीराजाच्या मागची साडेसाती अजून संपलेली नाही असे दिसतंय.दर ठीक मिळाला असला तरी गुळ उत्पादक शेतकरी मात्र तोट्यातच आहे. गुळ सर्व विकला गेला.पण म्हणावा तसा पैसा मिळाला नाही.यात आता शेतकऱ्यांच्या बाजूने असणाऱ्या सरकारनेच लक्ष घालणे गरजेचे आहे.
Leave a Reply