
कोल्हापूर: कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई ला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी आणि श्री अंबाबाईचे महात्म अबाधित राखण्यासाठी सांय.७.३० वाजता “छ. शाहू महाराज टर्मिनल (रेल्वे स्टेशन)” येथे कोल्हापूर – मुंबई येथे जाणारी महालक्ष्मी एक्प्रेस्स नावाने असलेल्या रेल्वेचे नामकरण “अंबाबाई एक्प्रेस शिवसेनेने केले. अंबाबाई मंदिराचा वाद आता एक्स्प्रेसपर्यंत जाऊन पोहचला आहे. कारण श्रीपूजकांना झालेली मारहाण ताजी असतानाच आता शिवसेना आणि कृती समितीने ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’चे नाव बदलून ‘अंबाबाई एक्स्प्रेस’ ठेवण्यासाठी आंदोलन केले. आज संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांनी छत्रपती शाहू महाराज स्थानकात आंदोलन करत महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या इंजिनापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ ही अक्षरे काढून टाकत, त्या ठिकाणी ‘अंबाबाई एक्स्प्रेस’ नावाचे स्टिकर्स लावले.करवीर निवासीनी महालक्ष्मी मंदिरातील श्री पूजक हटाओ आणि महालक्ष्मी ऐवजी अंबाबाई नावाचा उल्लेख करावा यासाठी आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमाराला शिवसेनेच्या वतीने महालक्ष्मी एक्स्प्रेसवरील महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या ऐवजी अंबाबाई एक्स्प्रेस नावाचे स्टिकर लावण्यात आले. एक्स्प्रेसच्या इंजिनापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत जिथे जिथे महालक्ष्मी एक्स्प्रेस असा उल्लेख होता त्याच ठिकाणी, अंबाबाई एक्स्प्रेस नावाचे स्टिकर्स लावण्यात आले. यावेळी ‘अंबामाताकी जय!’ ‘अंबाबाईच्या नावाने चांगभलं’, ‘शाहू महाराजांचा विजय असो’ अशा घोषणाही देण्यात आल्या
Leave a Reply