
कोल्हापूर : कोल्हापुरच्या नूतन महापौरपदी कॉंग्रेसच्या अश्विनी रामाने तर उपमहापौरपदी शमा मुल्ला यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आले. १० तारखेला महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. महापौर पदासाठी ताराराणी आघाडीच्या सविता भालकर यांना ३३ मते तर कॉंग्रेसच्या अश्विनी रामाने यांना ४४ मते मिळाल्याने त्या नूतन महापौर ठरल्या. त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी ३ अर्ज दाखल झाले होते. त्यातील नगरसेवक संतोष गायकवाड यांनी माघार घेतली. राजसिंह शेळके यांना ३३ मते आणि शमा मुल्ला यांना ४४ मते मिळाल्याने त्या उपमहापौर ठरल्या. शिवसेनेच्या ४ नगरसेवकांनी उशिरा सभागृहात प्रवेश केला पण कोणालाही मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका बजावली. हात उंचावून ही निवडणूक प्रक्रिया पार पडली अशा रीतीने पुन्हा कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीची सत्ता महापालिकेवर आली आहे.
Leave a Reply