
कोल्हापूर: कोल्हापूरचा संपूर्ण विकास करणार त्याचप्रमाणे शहराच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावर सर्व नगरसेवकांना एकत्र करणार. टोल कायमचा हद्दपार व्हावा यासाठी रस्यावर उतरून आंदोलन करणार असे नूतन महापौर अश्विनी रामाने यांनी सांगितले.महापौरपदासाठी निवड झाल्यानंतर त्या बोलत होत्या. तसेच कोल्हापूरचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास,रंकाळा प्रदूषण,कचरामुक्त व स्वच्छ कोल्हापूर व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन उपमहापौर शमा मुल्ला यांनी सांगितले. निवडीनंतर जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी,आयुक्त पी.शिवशंकर तसेच नगरसेवक यांनी अभिनन्दन केले.
Leave a Reply