
कोल्हापूर : गुणीदास फौंडेशन आयोजित पं.सी.आर.व्यास संगीत संमेलन येत्या २१ व २२ नोव्हेंबर रोजी राजाराम कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न होत आहे. कोल्हापुरातील रसिक प्रेक्षकांना सुरैल संगीताची मेजवानी मिळणार आहे.या वर्षीच्या संमेलनात पहिल्या दिवशी संजीव चिमलगी यांचे गायन आणि उस्ताद शाहीद परवेझ यांचे सतार वादन आणि २२ नोव्हेंबर रोजी रितेश मिश्रा व रजनीश मिश्रा यांची गायन जुगलबंदी व पं सतीश व्यास आणि पं.रोणू मुजमदार यांची संतूर व बासरी जुगलबंदी होणार आहे.या सर्व कलाकारांना पं.रामदास पळसुले,राजप्रसाद धर्माधिकारी,मुकुंदराज देव,चिन्मय कोल्हटकर या प्रसिद्ध कलाकारांची साथसंगत लाभणार आहे.संमेलनाचे यंदाचे हे ३ रे वर्ष असून या संस्थेच्या वतीने गेली ७ वर्षे संगीत,साहित्य,नृत्य अशा कलाप्रकारांचे दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.स्थानिक कलाकारांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नेहमीच वाव देत असते.अशी माहिती फौंडेशनचे उपाध्यक्ष दिलीप बनछोडे यांनी दिली.कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका गुणीदास फौंडेशन खासबाग आणि ज्युनिअर जंगल राजारामपुरी ४ थी गल्ली येथे येथे उपलब्ध आहेत तरी या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला सचिव अरविंद लाटकर,अमित कुलकर्णी,रविराज कारेकर,प्रफुल्ल महाजन उपस्थित होते.
Leave a Reply