
कोल्हापूर: गेली १७ वर्षे एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम श्री स्वामी विवेकानंद चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने अविरतपणे सुरु आहे.यंदाचे हे १८ वे वर्ष आहे.तरी या उपक्रमाचा वाढता प्रतिसाद पाहता यावर्षीही लाखो राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येणार आहेत.या सर्व राख्या येत्या ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.००वाजता शाहू स्मारक येथे समारंभपूर्वक मराठा बटालियन यांच्याकडे प्रदान करण्यात येणार आहेत.अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.शाळा,महाविद्यालये आणि नागरिक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.तरी राख्या संकलित होण्यासाठी प्रबोधन क्लासेस,आझाद चौक,अंबा कॅसेट,वांगी बोला,नागराज पेपर स्टॉल,शुक्रवार पेठ,विवेकानंद कॉलेज,भगिनी मंच,जय महाराष्ट्र रसवंती गृह,रविवार पेठ यासह प्रत्येक गावात केंद्रे असणार आहेत.तरी आपल्या राख्या या केंद्रांवर जमा कराव्यात तसेच चायनीज राख्या खरेदी करू नयेत असेही आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला कमलाकर किलकीले,अशोक लोहार,सागर घोरपडे,भाई जाधव,डॉ.सायली कचरे,मालोजी केरकर,राजेंद्र मकोटे,डॉ.आनंद गुरव यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते.
Leave a Reply