
कोल्हापूर: कोल्हापुरातील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर)यांच्यावतीने दोन दिवसीय अंतरराष्ट्रीय परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे.निर्मुल्यीकरण आणि पुनर्मल्यीकीरण जागतिक व्यवसायांचे प्रश्न व आव्हाने या विषयावर आधारित ही परिषद होणार आहे.येत्या ४ आणि ५ ऑगस्ट रोजी ही परिषद सायबर येथे होणार आहे.या परिषदेस इंटरनॅशनल फायनान्स क्वीन मेरी युनिव्हर्सिटी लंडनचे डॉ.सुशांत मलिक हे प्रमुख वक्ते असणार आहेत.तसेच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स अँड इकॉनॉमिक्स पुण्याचे संचालक प्रा.राजस परचुरे,तेलंगणातील सातवाहन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.मोहम्मद इकबाल अली,महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेचे कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड,कार्पोरेट ट्रेनर निखील कर्णिक हे मान्यवर वरील विषयावर प्रकाशझोत टाकणार आहेत. तसेच शिवाजी विद्यापाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते या परिषेदेचे उद्घाटन ४ ऑगस्टरोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे अशी माहिती सायबर चे कार्यकारी विश्वस्थ डॉ.व्ही.एम.हिलगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या परिषेदेत ८० शोधनिबंध सादर होणार आहेत.याचे नंतर रुपांतर पुस्तिकेत होणार आहे असे सचिव डॉ.यु.एम.देशमुख यांनी सांगितले.
भारतात नोटा बंदी नंतर जितका काळा पैसा बाहेर पडायला हवा होता तेवढा आला नाही.भारतीय अर्थव्यवस्थेवर तसेच व्यवसाय,सामान्य नागरिक यांच्यावर त्याचा काय परिणाम झाला याचा विचार होणे गरजेचे आहे.अश्या प्रकारच्या विषयावर परिषद घेणे खर तर धाडसाचे आहे आहे.असे अर्थ तज्ञ प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांनी सांगितले.यासाठीच कोल्हापुरात लंडन,हैद्राबाद,पुणे,मुंबई येथून विविध तज्ञ,संशोधक उपस्थित रहाणार आहेत.विद्यार्थानाही याचा लाभ मिळणार आहे.पत्रकार परिषदेला डॉ.टी.ए.शिवारे,डॉ.एम.एम अली,डॉ.ए.आर.कुलकर्णी,प्रा. राजेंद्र पारिजात यांच्यसह संयोजन समिती आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
Leave a Reply