

परिस्थिती हालाखीची असून त्यांना कुठल्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मागास असणारया मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावे अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेत केली ते राज्यघटनेत १२३ वी घटना दुरुस्ती सुचविणारे विधेयक, इतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगात दुरुस्ती विधेयक जे सोमवारी राज्यसभेत सादर झाले त्यावर बोलत होते .
दलित व बहुजन समाजाबद्दल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करताना खा.संभाजीराजे म्हणाले छत्रपती शाहू महाराज यांनी जाती निर्मूलनासाठी गंगाराम कांबळे या दलित समाजातील व्यक्तीला जेव्हा जातीच्या नावावरून केवळ पाणी प्यायले म्हणून उच्चवर्णीयांनी मारहाण केली ही गोष्ट जेव्हा त्यांना समजली तेव्हा त्यांनी गंगाराम कांबळे यांना सत्यशोधक नावाचे हॉटेल काढून दिले व या हॉटेलवर शाहू महाराज आपल्या संस्थानातील सरदार, जहागीरदार आदी उच्चवर्णीय लोकांना चहा प्यायला घेवून जात होते अशा प्रकारे त्यांनी जातीयभेद मोडून काढला ती समतावादी व्यवस्था आज आपल्याला निर्माण करावी लागेल अशी भूमिका संभाजीराजेनी सभागृहात मांडताच संपूर्ण सभागृहांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत
Leave a Reply