
नवं लग्न झालेल्या प्रत्येक विवाहितेसाठी मंगळागौर हा आनंदाचा सण असतो. पतीसाठीचं हे व्रत ती विवाहिता मनापासून करते. स्टार प्रवाहवरील ‘नकुशी…तरीही हवीहवीशी’ या मालिकेची नायिका नकुशीही पहिलीच मंगळागौर साजरी करणार आहे. मंगळागौरीसाठी ती उत्साहानं तयारी करत आहे. मात्र, ही पहिली मंगळागौर नकुशीच्या आयुष्यात काय घेऊन येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. नकुशी या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. नकुशी आणि रणजित यांच्यातलं पती-पत्नीचं नातं आता छान रंगलं आहे. नकुशीकडे गोड बातमी आहे. त्याशिवाय नकुशीची पहिली मंगळागौर असल्यानं बग्गीवाला चाळीतही उत्साहाचं वातावरण आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. या मंगळागौरीमध्ये पारंपरिक खेळही होणार आहेत. नकुशीच्या मंगळागौरीचं नाट्य रात्री ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर रंगणार आहे.नकुशी’ या मालिकेत नकुशीच्या भूमिकेत प्रसिद्धी आयलवार, रणजितच्या भूमिकेत उपेंद्र लिमये या लोकप्रिय जोडी सोबत भानूमामीची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी साकारत आहेत.
Leave a Reply