तळवलकर्स’ तर्फे सर्वांगिण सौष्ठव किफायतशीर सवलत:प्रशांत तळवलकर

 

कोल्हापूर: फिटनेसच्या बाबतीत लोक आता जागरूक झाले आहेत. लोकांना व्यायामासाठी प्रोत्साहन देण्याकरीता तळवलकर्स जिमने नविन ऑफर तयार केल्या आहेत. 85 शहरांत 211 व्यायामशाळा असलेल्या तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड (टीबीव्हीएफ) या भारतातील सर्वांत मोठ्या फिटनेस चेनने त्यांच्या प्रसिद्ध वार्षिक सवलत ऑफरची नुकतीच घोषणा केली आहे. तळवलकर्स वार्षिक सवलत योजनेच्या माध्यमातून भारतातील शरीरसौष्ठव क्षेत्रातील आपले प्रभूत्व टिकवून ठेवण्याकडे टीबीव्हीएफचे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यंदा टीबीव्हीएफने सर्वसमावेशी सदस्यत्वाचे पॅकेज केवळ 20 हजार रूपये + जीएसटी इतक्या कमी दरात ग्राहकांसाठी खुले केले आहे. अशी माहिती तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ श्री. प्रशांत तळवलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलीय.

या प्रसिद्धी पत्रकात तळवलकर यांनी म्हटलं आहे की,  “आमच्या वार्षिक ऑफरमुळे आमची ग्राहकसंख्या नक्कीच वाढणार असून परिणामी, बाजारपेठेतील आमचे सहभागही वाढणार आहेत. आमच्या ग्राहकांना मौल्यवान अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या व्यायाम प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणावर तसेच, व्यायामशाळांतील उपकरणांवर बरीच गुंतवणूक केली आहे. यंदा आमच्या ग्राहकांच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीची सुरवात करण्यात तळवलकर्सचा वैशिष्टपूर्ण सहभाग राहील, असा विश्वास वाटतो.भारतात आमच्या वार्षिक सवलत योजनेला उदंड प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. ‘तळवलकर्स’ या ब्रॅण्डच्या नावाचा अर्थच शरिरसौष्ठव असा असून आमच्या ग्राहकांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल,अशी आम्हाला आशा आहे.”सदस्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन टीबीव्हीएफतर्फे हे पॅकेज जाहीर करण्यात आले असून इतर कोणत्याही फिटनेस ब्रॅण्डला शक्य होणार नाही, इतक्या किफायतशीर दरात या ऑफरअंतर्गत विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

आयुष्य पालटून टाकण्याची उमेद बाळगणाऱ्या आणि आरोग्याप्रती जागरूक असलेल्या ग्राहकांनी अधिक माहितीसाठी www.talwalkars.net या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी किंवा 020- 66553636 या क्रमांकावर संपर्क साधावा. आमच्याwww.facebook.com/TalwalkarsIndiaया फेसबूक पानाला तुम्ही लाईक करू शकता किंवा अधिक माहितीसाठी आजच आमच्याwww.twitter.com/myTalwalkars टिवटर पानावर आम्हाला फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!